पुणे शहर

खोदलेले रस्ते पूर्ववत न करणाऱ्या ठेकेदारांवर व संबधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा : दिपाली धुमाळ

पुणे : पुणे शहरातील रस्त्यांची पाण्याची पाईप लाईन, विद्युत, ड्रेनेज, भूमिगत केबल आदी कामांसाठी खोदाई केली जाते मात्र ही कामे पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत केले जात नसल्याने रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे पाहिला मिळत आहे. या प्रकारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे विविध कारणासाठी खोदाईची परवानगी देताना रस्ते पूर्वी होते तसे करण्याच्या अटीवरच परवानगी द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. धुमाळ यांनी म्हंटले आहे की, सध्या रस्त्याला केलेली खोदाई बुजवून रस्ता पूर्ववत करताना अनेकदा सिमेंट काँक्रिटचा वापर केला जातो, परंतु जे रस्ते डांबरीकरण केलेले आहेत असे रस्तेही कॉंक्रीट  द्वारेच पूर्ववत केले जात असल्यामुळे रस्त्यांमध्ये उंचवटा  किंवा खोलगट भाग निर्माण होत आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

Img 20220118 wa00126707376222918832787

फुटपाथ व ब्लॉक बसविलेल्या ठिकाणीही खोदाईनंतर अशाच प्रकारे कॉंक्रीटद्वारेच पूर्ववत करण्याचे काम केले असल्याने फुटपाथही  नागरिकांना वापरास योग्य राहिलेले नाहीत. तसेच विविध कामांसाठी रस्ते खोदाई परवानगी देताना ठराविक मुदतीची अट घातली जाते परंतु मुदत संपल्यानंतर ही  सदर काम चालू असतात. तसेच कामाच्या ठिकाणी नागरिकांच्या जीवितास  धोका होणार नाही ना यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जात नाही. या सर्व बाबतीत संबधीत ठेकेदार व अधिकारी  जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
     

रस्ते खोदाई परवानगी देताना नियम व अटींमध्ये खोदाई नंतर रस्ते पूर्ववत करताना डांबरी रस्ते डांबरीकरण करून व सिमेंट रस्ते कॉंक्रीटीकरण करून तसेच फुटपाथ व पेविंग ब्लॉकचे रस्ते पेविंग ब्लॉकनेच दुरुस्त करणे बाबत समावेश करणे आवश्यक आहे. तशी अट परवानगी मध्ये घालण्यात यावी अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये