सेवा उद्योग ‘कामगार’ विम्यासाठी केंद्राने आधार द्यावा – आशुतोष घोलप

मुंबई : गेल्या २ वर्षांपासून देशासह राज्यात कोविड सदृश्य भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. याच बरोबर सेवा उद्योगातील कामगार जीवाची तमा न बाळगता काम करत आहेत. यात प्राधान्याने सिक्युरिटी सर्विसेस,हाउस किपिंग,मेडिकल सेवा यासारख्या इतर सेवा उद्योग क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या कामगारांची सुरक्षा लक्षात घेता त्यांना “विमा कवच” दिले गेले पाहिजे. अशी मागणी भाजप उद्योग आघाडीच्या शिष्टमंडळाने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे केली आहे.
उद्योग क्षेत्रात कर्तव्य बजावणाऱ्या कामगारांची सुरक्षा लक्षात घेता त्यांना “विमा कवच” दिले गेले पाहिजे. परंतु त्यांना ज्या कंपनीने नियुक्त केले त्या कंपन्या काही प्रमाणात आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे,त्यामुळे त्या कंपन्यांवर बोझा न लादता केंद्र शासन(माय,बाप) म्हणून विशेष पॅकेज तयार करत सर्व कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना देखील ‘विमा संरक्षण कवच’ देण्यात यावे,याकरिता महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली असता,सेवा उद्योजकांच्या पदरी निराशा आली.
आपल्या जीवाची तमा न बाळगता ही कामगार मंडळी अविरतपणे सेवा बजावत असतात,परन्तु यांना काम देणाऱ्या सेवा कंपन्या देखील गत २ वर्षांपासून नुकसान सहन करत आपला गाडा हाकत आहेत. यातील जे कामगार केंद्र,राज्य यांच्या नियमावलीत बसतात त्यांना विशेष पॅकेज द्वारे सेवा उद्योजकांवर अतिरिक्त बोझा न देता सेवा उद्योग कामगार ‘विमा संरक्षण कवच’ विषयी केंद्र सरकारने आधार द्यावा,अशी मागणी भाजपा उद्योग आघाडी सदस्य आशुतोष घोलप यांनी केंद्रीय ‘अर्थ’ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांची मुंबई येथे भेट घेऊन चर्चा करत निवेदन दिले.

सेवा उद्योगात सर्वात जास्त रोजगार दिल्या जातो. परंतु या कोविड काळात मोठा परिणाम जाणवत आहे, तरी सूक्ष्म व लघु सेवा उद्योगातील कामगारांसाठी विशेष विमा योजना द्यावी अशी मागणी उद्योग आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे सेवा उद्योगावरील आर्थिक ताण कमी होऊन काहीसा दिलासा मिळेल. –प्रदीप पेशकार,
प्रदेश अध्यक्ष
भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र.
सेवा उद्योगात काम करणारे कर्मचारी हे देखील फ्रंटलाईन वर्करच आहेत त्यामुळे त्यांच्या भविष्याची काळजी सरकारने घेणे गरजेचे आहे त्यामुळे उद्योग आघाडी च्या वतीने त्यांना विमा कवच मिळावे अशी मागणी करण्यात आली आहे.
विश्वजीत देशपांडे
सरचिटणीस
भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्र



