पुणे शहर

क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या कामासंदर्भात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

क्रांतीगुरु लहुजी पुरस्काराचे नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते वितरण

पुणे : क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या कामासंदर्भात योग्य ती प्रक्रिया तातडीने पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात येतील.तसेच समितीच्या कार्यालयासाठी तातडीने जागा उपलब्ध करून दिली जाईल. असे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत आद्य क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२७ व्या जयंतीनिमित्त देण्यात येणाऱ्या क्रांतीगुरु लहुजी पुरस्काराचे वितरण नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील समाजासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांना आज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन अहिर, आमदार निलेश लंके, काँग्रसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, नगरसेवक बाबुराव चांदेरे, अविनाश बागवे,शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राजेश पळसकर , महेश हांडे आदी उपस्थित होते. क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती महाराष्ट्र शासन अध्यक्ष विजय डाकले,बाळासाहेब भांडे, रवि पाटोळे रामभाऊ कसबे , डॉ.राजु आडागळे,शांतीलाल मिसाळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

Img 20211105 wa0169

गोऱ्हे म्हणाल्या, मुंबईतील चिराग नगर याठिकाणी अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक व्हावे यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व संबंधित अधिाऱ्यांबरोबरही बैठक झाली असून त्याबाबतही लवकरच निर्णय होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीसाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. आता महापालिकेने त्यासाठी आर्किटेक्ट नेमण्या बाबत तसेच भूसंपादन प्रक्रिया व Ulc प्रमाणपत्र यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे. या स्मारकाच्या कामाला लवकरच प्रारंभ व्हावा यासाठी अधिकाऱ्यांबरोबर सातत्याने चर्चा करून त्यातील अडचणी दूर केल्या जातील.

सचिन अहिर म्हणाले, मागील सरकार या समितीला निधी देऊ शकले असते पण त्यांनी तो दिला नाही, पण माहाविकास आघाडीने निधीची तातडीने तरतूद करून स्मारकाच्या कामाची प्रक्रिया सुरू केली आहे. अण्णा भाऊ साठे महामंडळ पुनर्जीवित करणेही आता गरजेचे आहे. या थोरांच्या विचारातून प्रेरणा घेऊन समाजाने कृती करून पुढे गेले पाहिजे.

प्रास्ताविक करताना समितीचे अध्यक्ष विजय डाकले म्हणाले, क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांनी समाजाला कुटुंब मानून काम केले. आजचा क्रायक्रम हा समाजाला चैतन्य देणारा कार्यक्रम आहे. समाजाला अपेक्षित असे काम समितीच्या माध्यमातून करण्यात येईल. आद्य क्रांतीगुरू लहुजी साळवे यांचे विचार नव्या पीढीला कळावेत, समाजाची शैक्षणिक प्रगती साधली यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Img 20211113 wa00056142399306847650861

रमेश बागवे म्हणाले, क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक समाजाला प्रेरणादायी ठराव अशा पद्धतीने उभे केले जावे. या स्मारकातून समजातील मला मुलींना शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी अशा पद्धतीने त्याची निर्मिती व्हावी. पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने सुरू असलेल्या संस्थेस विरोध करत आहेत पण त्यांचा डाव यशस्वी होऊ दिला जाणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस च्या नगरसेवकांनी एकत्र त्यांच्या या कृतीला विरोध केला आहे.

यावेळी या मान्यवरांना क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारांची नावे पुढीलप्रमाणे श्रीपल सबनीस,भाऊसाहेब सोनवणे, राजुभाऊ आवळे, उत्तम प्रकाश कंधारे,सुभाष जगताप, शरद गायकवाड,डॉ. मिलींद आवाड, हनुमंतराव साठे,दिलीपराव आगळे, विशाल धनवडे, संजय ढोकळ, भगवान वैराट, शंकरराव तडाखे,अशोक लोखंडे, रविंद्र दळवी, अस्मिता जोगदंड,मार्तंड साठे, अनिलदादा हातागळे,मच्छिंद्र सकटे, सागरदादा शिंदे सातारा,नाथा कसबे,गणपत घडशी,अनिल शिंदे,शाहीर शैलेश लोखंडे,योगेश दोडके मयुर भांडे,डॉ. चंद्रकांत जनार्धन साळवे ,डॉ. पद्माकर बा. कोल्हे

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये