पुणे शहर

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त झेरॉक्स मशीन भेट देऊन विशेष व्यक्तीस स्वयंरोजगारासाठी मदत..

पुणे : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत कोथरुड भाजप युवा मोर्चाच्या वतीने बालाजी मोरे या विशेष व्यक्तीस कोरोना संकट काळात पुन्हा हिमतीनं उभे राहण्यासाठी झेरॉक्स मशीन भेट देण्यात आली. Helped special person for self-employment by gift a Xerox machine on the occasion of Devendra Fadnavis’s birthday.

कोथरुड भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवून विशेष असणाऱ्या बालाजी मोरे यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. याप्रसंगी पुणे शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, सरचिटणीस प्रतीक देसर्डा, अजिंक्य थोरात, कोथरुड मंडल सरचिटणीस ऋषीकेश बराटे, संपर्क प्रमुख स्वप्निल राजीवडे, समीर जोरी, अशिष मोगलाईकर उपस्थित होते.

दुष्यंत मोहोळ म्हणाले, आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी घालून दिलेला निःस्वार्थी सेवेचा वसा कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही या उपक्रमातून केला आहे. इनेबलर संस्थेचे प्रमुख अमोल शिंगाडे यांचे दिव्यांग सहकारी बालाजी मोरे यांना झेरॉक्स मशीन देऊन, या अडचणीच्या काळात रोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

WhatsApp Image 2021 07 27 at 8.25.56 AM
WhatsApp Image 2021 07 27 at 8.26.19 AM
IMG 20210727 WA0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये