पुणे महापालिकेबाहेरील छत्रपती शिवाजी पुलाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज पुल असा करावा…

पुणे: पुणे महापालिकेच्या मुख्यालयासमोरील ब्रिटिशांनी बांधलेल्या मुठा नदीवरील दोन्ही पुलाच्या बाजूला असलेल्या नाम फलकावर ‘छत्रपती शिवाजी पूल’ असा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या पुलाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल’ असा नामविस्तार करण्यात यावा अशी सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आली असून त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. The Chhatrapati Shivaji Maharaj Bridge outside the Pune Municipal Corporation should be renamed as Chhatrapati Shivaji Maharaj Bridge …
तसेच पुलावर असलेला नामफलकाची उंची फारच कमी असल्याने यावरुन ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या पायाचा स्पर्श होतो आहे त्यामुळे कळत-नकळत छत्रपती शिवरायांचा अवमान होत आहे. यामुळे याबाबतची सूचना खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे केलेली आहे.
महापालिका आयुक्तांनी यात लक्ष घालून पुणे महापालिकेच्या मुख्यालयासमोरील पुलाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज पूल’ असा नामविस्तार करण्याबाबत, तसेच नवीन नामफलक जमिनीच्या पृष्ठभागापासून उंचीवर लावण्याबाबत संबंधीत अधिका-यांसोबत संयुक्त पाहणी दौरा घेऊन आवश्यक त्या सूचना संबंधीतांना द्याव्यात अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.




