बावधन येथे उभारलेल्या शिल्पातून देशभक्तीची प्रेरणा मिळणार ….

बावधन : सीमेवर लढत असलेल्या सैन्याबाबत व भारतीय हवाई दलाविषयी सर्वच भारतीयांना अभिमान वाटत असतो. भारतीय सैन्याच्या शैर्याला सर्वचजण सलाम करत असतात. आणि याचीच जाणीव ठेवून बावधन मधील अमर जवान चौकात नगरसेवक दिलीप वेडे पाटील यांच्या प्रयत्नांतून महापालिकेच्या वतीने भारतीय सैन्य दलाशी निगडीत स्मारक उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. The sculpture erected at Bawadhan will inspire patriotism.

यावेळी बावधन येथील अमर जवान चौकामध्ये भारतीय सैन्य दलाशी निगडीत स्मारका बरोबरच अमर जवान वाचनालयाचे उद्घाटन व कोअर सिटी अंतर्गत कोथरूड डेपो ते बावधन ते कोथरूड डेपो या वर्तुळ मार्गावर दोन अटल बससेवेचा शुभारंभ बापट यांच्या हस्ते करण्यात आला. .
याप्रसंगी बोलताना बापट म्हणाले की, भारतीय सैन्य दलाबाबत नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांच्या मनामध्ये असलेले प्रेम या स्मारकातून व्यक्त होत आहे. तसेच ५ रूपायमध्ये ५ किलोमीटर अटल बस सेवेच्या संकल्पनेतून नागरिकांच्या हितासाठी दोन बससेवा वेडेपाटील यांच्या माध्यमातून बावधनकरांसाठी सुरू करण्यात आल्या असून त्याचा फायदा प्रवाशांना मिळणार आहे.



यावेळी नगरसेवक किरण दगडे, नगरसेविका अल्पना वरपे, श्रद्धा प्रभूणे-पाठक, स्वीकृत सदस्य विलास मोहोळ, वैभव मुरकुटे, भाजपा क्र. 10 चे अध्यक्ष सागर कडू, पश्चिम महाराष्ट्र क्रीडा आघाडी चे अध्यक्ष धनंजय दगडे, सहकार्यालयीन मंत्री राजेश कुलकर्णी, भाजपा ग्रामविकास आघाडी अध्यक्ष मंदार घुले, राजेश मनगिरे, राजाभाऊ जोरी, अजित शिवगण, रूपेश भोसले, रुगाराम चौधरी, केसरम चौधरी, ह.भ.प. शंकर वेडे, ह.भ.प.कान्हू वेडे, ह.भ.प. अरुण वेडे, ह.भ.प. बंडू माताळे, सुरेश गुरव, सुभाष वाघमारे, बाळासाहेब कुडापणे, दिलीप पुराणिक, कल्याणी कलावंत, निधी भाटीया, ऊज्वला पाटील, विजय करंजावणे, तसेच बावधन ज्येष्ठ नागरिक संघ व बावधन हास्य क्लबचे सदस्य आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे व विजय करंजावणे यांनी केले व आभार शैलेश वेडेपाटील यांनी मानले.
बावधन परिसरातील नागरिकांसाठी चालू करण्यात आलेल्या बसचा मार्ग
अटल बस क्र. के – 21 मार्ग (कोथरूड डेपो – शिंदे फार्म – चांदणी चौक – मराठा मंदिर – त्रिमूर्ति चौक – एल.एम.डी.चौक – लक्ष्मी दत्त चौक – टोयोटा शोरूम – बाळतुका कोर्नर – चेलाराम हॉस्पिटल – सूर्यदत्ता कॉलेज – डीएसके रानवारा – डी पॅलेस – बँक ऑफ महाराष्ट्र – शिंदे नगर – चांदणी चौक – कोथरूड डेपो)
के – 21 (ए) मार्ग
(कोथरूड डेपो – शिंदे फार्म – चांदणी चौक – मराठा मंदिर – त्रिमूर्ति चौक – एल.एम.डी.चौक – टिन्सेल टाउन – विज्ञांननगर चौक – सिद्धिविनायक चौक – बँक ऑफ महाराष्ट्र – डी पॅलेस – बावधन पोलिस चौकी – रामनगर कॉलनी – बावधन पोलिस चौकी – डी पॅलेस – बँक ऑफ महाराष्ट्र – शिंदे नगर – चांदणी चौक – कोथरूड डेपो)



