राष्ट्रीय

नितीशबाबूंच्या कामाची मोदींनी केली प्रशंसा

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात रंग भरू लागला आहे. बिहारचे मुख्य मंत्री नितीशकुमार यांना भाजप दगा देईल, अशी चर्चा घडवून आणली जात आहे. मात्र प्रत्यक्ष प्रचारात भाजप नेते नितीशकुमार पुन्हा मुख्य मंत्री होतील असे ठामपणे सांगत आहेत.

समस्तीपूर येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार भावी मुख्य मंत्री असतील असे भाषणाच्या प्रारंभी सांगितले.याही पुढे जाऊन नितीशबाबू असा उल्लेख करून त्यांच्या कामाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. पाणी पुरवठा सुधारणांसह अनेक कामे करून ग्रामीण भागातील महिलांचे जीवन नितीशबाबूंनी सुसह्य केले.

Img 20201028 wa0145

तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या असे मोदी म्हणाले. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानात भाजप आघाडीची सरशी दिसून येते आहे, असा दावा मोदी यांनी केला. या सभेला प्रचंड गर्दी होती. या प्रतिसादाबद्दल आभार मानताना बिहारसाठी माझ्या मनांत संकल्प आहेत असे सांगून त्याच्या पूर्ततेची ग्वाही दिली..

Img 20201024 wa0166 1

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये