कोथरुड

केळेवाडीत मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू ही आनंदाची बाब ; नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी : दीपक मानकर

कोथरुड : आज संपूर्ण वातावरण पुन्हा बदलत असताना नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. देण्यात येत असलेल्या कोरोना लसीचा परिणाम चांगल्या पद्धतीने दिसून येत असून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी व वय वर्ष ४५ पुढील ज्यांना आजार आहेत अशा नागरिकांनी न घाबरता लस घ्यावी असे आवाहन नगरसेवक दीपक मानकर यांनी केले आहे. It is a matter of pleasure to start a free corona vaccination center in Kelewadi;Citizens should be vaccinated out of fear

केळेवाडी मधील कै. सुंदराबाई राऊत दवाखान्यात आज मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक, माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेविका वैशाली मराठे, छाया मारणे, कोथरुड क्षेत्रीय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम, डॉ. संतोष मुळे, डॉ. अंजली टिळेकर, दिवा प्रतिष्ठान चे संस्थापक हर्षवर्धन मानकर, करण मानकर, शिवाजी मानकर, दिलीप कानडे आदी उपस्थित होते.

दीपक मानकर म्हणाले, माझ्या प्रभागात ७० टक्के नागरिक  वस्ती विभागात राहतात. त्यामुळे या भागातील गोरगरीब नागरिकांबरोबरच सोसायटीतील नागरिकांनाही लसीकरणाचा लाभ मिळावा या दृष्टिकोनातून मी प्रयत्न केला व आज राऊत दवाखान्यात लसीकरण मोहिमेला सुरवात झाली याचा निश्चितपणे आनंद होत आहे. नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Img 20210223 wa0156

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये