पुणे शहर

शिवचरित्र येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी : प्रसाद मोरे.. शिवजयंतीनिमित्त मोरया मित्र मंडळाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन

कोथरूड : छत्रपती शिवाजी महाराज जंयती नाचुन नाही वाचुन साजरी करा हा स्तुत्य उपक्रम मोरया मित्र मंडळाच्या वतीने  शिवजयंती निमित्ताने मागील अनेक वर्षांपासून दरवर्षी राबवला जात आहे.  आयोजित करण्यात आला होता. यंदा शिवजयंती निमित्त प्रसिद्ध युवा शिवशंभूव्याख्याते प्रसाद मोरे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान श्री सरस्वती विद्या मंदिर शाळेमध्ये आयोजित करण्यात आले होते. येणाऱ्या पिढीसाठी शिवचरित्र प्रेरणादायी राहणार असल्याचे मत यावेळी मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

शिवजयंतीच्या निमित्ताने मोरया मित्र मंडळ कर्वेनगर पुणे यांच्या वतीने  कर्वेनगर ते डेक्कन भागामधील सर्व शाळांमध्ये जाऊन राष्ट्रवीर छत्रपती संभाजी आणि साधू पुत्र शंभू हे शंभू चरित्र भेट देण्यात आले. तसेच पुणे मनपा साह्यक आयुक्त दिपक राऊत, विजय नायकल , पोलिस उपायुक्त संभाजी कदम, वरीष्ठ पोलिस निरीक्षक वारजे पोलिस स्टेशन विश्वजीत काइंगडे  यांनाही शंभू चरित्र भेट देण्यात आले.

Img 20250310 wa02324095435649637866308

ह्या कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे संस्थापक केदार वसंत मारणे यांनी केले होते. यावेळी ते म्हणाले, मोरया मित्र मंडळ सतत सामाजिक उपक्रम राबवत असते. गेल्या ५ वर्षा पासून शिवाजी महाराज जयंती नाचून नाही वाचुन साजरी करावी हि संकल्पना पुढे आली कारण शिवाजी म्हणजे
शि म्हनजे शिका
वा म्हनजे वाचा
जी म्हनजे जिंका
म्हणून शिक्षण घेणाऱ्या मुलांना शिवाजी महाराज कळावे म्हणून आम्ही ही पुस्तके त्याच्या पर्यंत पोहचवत आहोत. आम्हाला शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या विचारांची पिढी निर्माण करायची आहे. म्हणून त्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहे. शिवचरित्र हे प्रेरणादायी आहे भविष्यात विद्यार्थी शिवचरित्राचं वाचणं केल्यानंतर जग जिंकल्या शिवाय राहणार नाही असं वाटतं म्हणून हा उपक्रम आम्ही राबवत आहोत.

हे शिवचरित्र  माजी भारतीय इतिहास संशोधक मंडळ सभासद मंगेश नवघणे व केदार मारणे यांच्या हस्ते  देण्यात आले. यावेळी  मंडळाचे अध्यक्ष रोहिदास जाधव, पौर्णिमा केसवड,अनिल आठवले, देवेंद्र दांडेकर, सागर जगताप, गिरीश भागवत,मयुर बनकर , विनायक उभे मुख्याध्यापक किरण कोल्हे,शिक्षक कैलास सरतापे, नीला कुलकर्णी आदी शिक्षक उपस्थित होते . शिक्षकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Img 20250310 wa02282851203640248970727

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये