पुणे शहर

कोथरूड मध्ये जाहीर झालेल्या उमेदवारांपेक्षा ठाकरे गटाच्या जाहीर न झालेल्या उमेदवाराचीच जास्त चर्चा ; भाजपची डोकेदुखी वाढणार ?

अमोल साबळे

पुणे : सध्या कोथरूड भाजप बुचकळ्यात पडले असून Chandrakant Patil चंद्रकांत पाटील यांच्या समोर कोण उमेदवार येणार याकडे भाजप कार्यकर्ते पदाधिकारी यांचे लक्ष असल्याचे दिसत आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उमेदवार जोपर्यंत जाहीर होत नाही तो पर्यंत या निवडणुकीचा अंदाज लावणे अवघड आहे.  ठाकरेंच्या शिवसेनेकडून ज्या अर्थी उमेदवार जाहीर करण्यास उशीर होत आहे. त्या अर्थी महविकास आघाडी या मतदार संघात वेगळी खेळी करण्याच्या तयारीत असून त्याचीच रणनीती  एकंदरित सुरू असल्याची चर्चा  सुरू आहे. त्यामुळे एकूणच या मतदार संघात भाजप समोरची डोकेदुखी वाढणार एवढे नक्की आहे.

भाजपने चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली, मनसेने किशोर शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार अजून जाहीर होत नसल्याने नक्की महाविकास आघाडीत काय शिजत आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या भाजपच्या व मनसेच्या जाहीर झालेल्या उमेदवारांपेक्षा ठाकरे गटाच्या जाहीर न झालेल्या उमेदवारीचीच चर्चा कोथरूड मतदार संघात जास्त सुरू आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर न होताच महाविकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू आहे.

कोथरूडमध्ये ठाकरे गटाचे सुतार, मोकाटे हे दोन मोठे फॅक्टर आहेत. राज्यातली बदललेली राजकीय समीकरणे, मराठा आंदोलन, तोडफोडीचे राजकारण, उध्दव ठाकरे व शरद पवार यांच्या पाठीमागे उभा राहत असलेला मतदार यामुळे या विधानसभा निवडणुकीत कोथरूड ची राजकीय गणिते बदलण्याची दाट शक्यता असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधातील मागच्या निवडणुकीतील आघाडीचं गणित थोडक्यात चुकल होत. ती निवडणूक भाजपला बालेकिल्ल्यात घाम फोडणारी होती. आतातर राज्यातील परिस्थिती बदलली आहे. त्याचे परिणाम कोथरूड मतदार संघात कसे पडतात त्यावर चंद्रकांत पाटील यांचं भवितव्य अवलंबून असेल. शिवसेना ठाकरे पक्षाचा उमेदवार जाहीर झाल्यावर येथील निवडणुकीची खरी गणिते समोर येतील आणि कोथरुड मध्ये निवडणूकीत रंग भरले जातील. ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारी जाहीर करण्यासाठी निर्माण केलेली उत्सुकता कधी संपणार हे आता पहावे लागेल.

Img 20241020 wa00015243193050905147069
Img 20240404 wa0016281291197243699799508498
Img 20240404 wa0012281298841886320058264868
Img 20240404 wa0013281291032765212350995267

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये