कर्वेनगर मधील डॉक्टरांचा चेतन भालेकर मित्र परिवाराच्या वतीने सन्मान..
कर्वेनगर : डॉक्टर दिनानिमित्त कर्वेनगर मध्ये अनेक वर्षांपासून रुग्णसेवा करत असलेल्या डॉक्टरांचा सन्मान चेतन भालेकर मित्र परिवाराच्या वतीने आज करण्यात आला. On behalf of Chetan Bhalekar, the doctors of Karvenagar were honored on the occasion of Doctors’ Day.
कर्वेनगर मधील डॉ. नरेंद्र खेनट, डॉ. सौ. खेनट, डॉ.सचिन गांधी, डॉ. श्रुती बेलगमवार या डॉक्टरांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते चेतन भालेकर, मंगेश जगताप, प्रतिक नलावडे, रोहित चव्हाण, अक्षय वरपे, सोमनाथ आंग्रे, प्रथमेश भालेकर, ओंकार मते आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या संकट काळात सर्वच डॉक्टरांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. या संकट काळात सर्वांच्याच मनात भीतीने घर केले होते, अशा वेळी कर्वेनगरमध्ये अनेक वर्षांपासून काम करत असलेल्या या डॉक्टरांनी या भागातील नागरिकांना भीतीच्या वातावरणातून बाहेर काढण्याचे काम केले तसेच रुग्णांना योग्य उपचार दिले. त्यामुळे आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधुन त्यांचा सन्मान करण्यात आल्याचे चेतन भालेकर यांनी सांगितले.




