म्हणून शिवसैनिक शांत उध्दव ठाकरेंचा भाजपला इशारा

मुंबई : सत्तेत आल्यापासून सातत्याने चारित्र्यहनन, खोटेनाटे आरोप, महाराष्ट्राची बदनामी केली जात असताना शिवसेना गप्प कशी अस बोललं जातंय पण शिवसैनिक माझं ऐकतात हे तुमचं नशीब समजा असा इशारा आज मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणात भाजपला दिला आहे.
ठाकरे म्हणाले शक्यतोवर संयमान बोलायचं असं मी ठरवलं आहे. संयमाच महत्त्व मला माहित आहे. पण टक्कर देण्याची कुणात खुमखुमी असेल तर ती त्यांनी जरूर द्यावी. औरंगजेब अफजलखानाला ज्या मातीत गाडलं त्या मातीचा तेज अजून मजबूत आहे हे लक्षात ठेवावं. शिवसैनिक शांत आहे म्हणूनच तुम्ही बोलताय असाच इशारा ठाकरे यांनी एक प्रकारे आपल्या आजच्या भाषणाच्या शैलीत दिला आहे.
महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्याच्या छाताडावर गुढी उभारल्याशिवाय राहणार नाही. बिहारमध्ये कोरोना लस मोफत दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचा दाखला देत ठाकरे म्हणाले महाराष्ट्रात काही अशी बेडकं आहेत त्यांना लस, इंजेक्शन सारखी द्यावी लागतात.
संकटाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जात असून महाराष्ट्र पुढे जात आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जून-जुलैमध्ये जे करारनामे झाले त्यानुसार महाराष्ट्रात अनेक उद्योग सुरू होत आहेत. हजारो कोटींची गुंतवणूक भूमीपूत्रांसाठी महाराष्ट्रात येत आहे. त्यातून कुशल, अकुशल मराठी मुलांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी आजच्या भाषणात सांगितलं.



