पुणे शहर

पुण्यात सराफाची लूट, ७३ हजारांच्या सोनसाखळीसाठी कोयत्याचा धाक

पुणे: पुणे जिल्ह्यातील लोहगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली. सराफ व्यवसायिकाला कोयता दाखवून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. ही चोरी ७३ हजार किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची असून चोराने त्याच्या सहकाऱ्यासह ही चोरी केली आहे.

पुणे शहरात चोरट्यांना पुणे पोलिसांची भीतीच नाही का? असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे. हातात धारदार शस्त्रे घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्या पुण्यात वाढत आहेत.लोहगाव परिसरात चक्क सराफ व्यावसायिकाच्या कोयत्याच धाक दाखवून लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

        आझाद चौकात महाले ज्वेलर्स सराफ मध्ये दोन चोरटे दुकानात शिरले दागिने खरेदी करण्याचा बहाणा करत त्यांनी चौकशीला सुरुवात केली त्यानंतर एकाने सराफ व्यापाऱ्याला त्याचा धाक दाखवला तर दुसऱ्याने जीवे मारण्याची धमकी देऊन 73 हजारांच्या सोनसाखळ्या लुटल्या. या घटनेनंतर या व्यावसायिकाने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा  पोलिस अधिक तपास करत आहेत.

Fb img 1648963058213

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये