राष्ट्रीय

सर्वोच्च न्यायालयात आज ओबीसी आरक्षणाबाबत सर्वात मोठा निर्णय, महाराष्ट्राच्या दृष्टीने ठरणार महत्वाचा दिवस

ओबीसी आरक्षणाबाबत मध्य प्रदेश सरकारचा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालय मान्य करणार का? याचा फैसला आज होणार आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाच्या दृष्टीने देखील हा दिवस आणि निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सुनावणीत मध्यप्रदेश सरकार ट्रिपल टेस्टच्या निकषांसह रिपोर्ट पूर्ण करण्यासाठी अधिकचा वेळ कोर्टाकडे मागत होते. मध्य प्रदेश सरकारला हा अधिकचा वेळ मिळणार का? की तिथेही ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुकांचे आदेश कोर्ट देणार का? याचा निर्णय आज होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला शुक्रवारी ओबीसीचे संख्या देण्यास सांगितली होती. त्यानुसार सरकारकडून मागासवर्गीय आयोगाकडून एक रिपोर्ट प्रस्तुत करण्यात आला. याशिवाय सरकारने कोर्टाकडे वेळ मागितला होता. परंतु न्यायालयाने ओबीसीचा निकाल मंगळवारपर्यंत राखून ठेवला आहे. याचिकाकर्त्यांनी वकिलांनी कोर्टाला विनंती केली की, संविधानानुसार पंचायत आणि नगरपालिकेचा निवडणुका लवकरात लवकर घेण्याचे आदेश द्यावे.

नळस्टॉप चौकातील उड्डाणपूल पाडावा; भाजप नेत्यांच्या आग्रहामुळे नागरीकांना मनस्ताप- दीपक मानकर (माजी उपमहापौर)

Img 20220425 wa00102978251768482543832

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये