अजय देवगणच्या कुटुंबात दुःखद घटना ;भाऊ अनिल देवगणचे निधन

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणचा भाऊ अनिल देवगणच निधन झालं आहे. अजय देवगणने याची माहिती स्वतः सोशल मीडियावरून दिली आहे. काल रात्री आपल्या भावाच निधन झालं आहे. त्याच्या या अचानक जाण्याने आम्हा सर्वांनाच धक्का बसला असल्याचे अजय देवगणने आपल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे.
अनिल देवगणने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. फुल और कांटे, प्यार तो होना ही था या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. सन ऑफ सरदार या चित्रपटासाठी क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम केले होते.
गेली काही महिने बॉलीवुड ला अशा धक्क्यांना सामोरे जावे लागत आहे. सुशांत सिंह राजपूत, ऋषी कपूर, इरफान खान, वाजीद खान, निशिकांत कामत, एस.पी. बालसुब्रमण्यम अशा दिग्गज कलाकारांनी मागील काही दिवसांमध्ये जगाचा निरोप घेतला आहे. कलाकारांच्या अशा जाण्याने बॉलिवूडला एकमागुन एक धक्के बसत आहेत.



