महाराष्ट्र
चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरेंची सूचक पोस्ट

मुंबई : शनिवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवून शिवसेना हे नावही लावता येणार नाही असा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी Instragram वर एक पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे . उद्धव ठाकरे यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला असून त्याला जिंकून दाखवणारच अशी सूचक कॅप्शन दिली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे यांची पुढची रणनीती काय असणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार असून आज दुपारी बारा वाजता मातोश्रीवर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे, त्यात पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.







