शरद पवारांनी सांगितले भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होण्याचे कारण

मुंबई : युनोच्या झालेल्या बैठकीत भारत तटस्थ राहिला. आपण रशियाविरोधात भूमिका घेतली नाही, युक्रेनच्या बाजूने भूमिका घेतली नाही म्हणून युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी सांगितलं आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session maharashtra 2022) पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारमधील (mva government) तिन्ही पक्ष स्नेहभोजनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. यावेळी शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना मार्गदर्शनं केलंय. तसंच युक्रेनमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबद्दल चिंता व्यक्त केली.
‘युक्रेन आणि रशियामध्ये जे युद्ध सुरू आहे त्यात महाराष्ट्रातले सर्वात जास्त विद्यार्थी अडकले आहेत. या संकटाकडे सत्ताधारी लक्ष देत नाही, पालक आणि विद्यार्थी प्रचंड त्रास सहन करत आहेत. युनोमध्ये बैठक घेतली तेव्हा भारत तटस्थ राहिला. आपण रशियाविरोधात भूमिका घेतली नाही, युक्रेनच्या बाजूने भूमिका घेतली नाही म्हणून युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत, असंही शरद पवारांनी सांगितलं.



‘मोदी सरकारचे चार मंत्री तिकडे गेले आहेत. एकही मंत्री युक्रेन किंवा रशियात गेले नाही. केंद्र सरकारची चर्चेसाठी तयारी नाही. राहुल गांधी आणि आम्ही सर्व विरोधक चर्चेला तयार होतो मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विद्यार्थ्यांचे काही पडले नाही, अशी टीकाही पवारांनी केली.



