पुणे शहर

कोकणवासियांना एक हात कर्तव्यरुपी मदतीचा आम्हा कोथरुडकरांचा ; उमेश भेलके यांच्याकडून पूरग्रस्त भागात मदत..

कोथरुड : शिवसेना व युवासेना कोथरुड पुणेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने महाड तलुक्यातील पूरग्रस्त भागात मदत पोहचवण्यात आली. शिवसेना कोथरुड विभाग संघटक उमेश उत्तम भेलके यांच्या वतीने कोकणवासियांना एक हात कर्तव्यरुपी मदतीचा, आम्हा कोथरुडकरांचा या उपक्रमा अंतर्गत ही मदत देण्यात आली.

महाड तालुक्यातील चवदार तळे, वेताळ नगरी तांबडभुवन, बिरवाडी टांकीकोडं या पूरग्रस्त गावांत टी शर्ट, ट्रॅक पँट, साड़ी, ब्लॅंकेट , सोप, टूथ पेस्ट, ब्रश, खाण्याची वस्तु बिस्कीट ,मॅगी, अशी पॅकेट्स व ३६०० लिटर बिस्लेरी बॅाक्स पाणी इत्यादी  उपयोगी सामान पुरग्रस्त कुटुंबा ला देण्यात आले. या वेळी अजय भुवड, सचिन कोकाटे, ॲड,संतोष भेलके व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Img 20210802 wa0172

उमेश भेलके म्हणाले, पुरामुळे महाड तालुक्यातील गावांची आवस्था बिकट झाली आहे. या परिस्थितीतून सावरण्याचा प्रयत्न येथील कुटूंबे करत आहे. त्यांचे दैनंदिन जीवन पूर्वपदावर यावे म्हणून आम्ही हा एक हात कर्तव्य रुपी मदतीचा हा उपक्रम राबवला आले. ही मदत पोहचवत असताना तेथील कुटुंबांनी भावनिक भावना व्यक्त केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने हा उपक्रम राबवण्यात आला असून ही मदत पोहचल्यानंतर एक मानसिक समाधान मिळाले.

Img 20210727 wa0218

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये