डॉ. दत्ता कोहिनकर यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना मिळाली जीवन जगण्याची व करिअरची दिशा..

पुणे : विद्यार्थ्यांनो व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घ्या, अनेक कलांमध्ये निपुण व्हा. वेगवेगळ्या वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्नाचे स्रोत चालू करा. कुठल्याही एका गोष्टीवर अवलंबून राहू नका. वॉरन बफे म्हणल्याप्रमाणे १०० रूपये एकाच मार्गाने येत असतील तर त्याच्यावर अवलंबून न राहता एक एक रुपया १०० मार्गांनी येऊ द्या. भगवान बुद्ध म्हणतात जीवनात प्रत्येक गोष्ट बदलते तसे करिअर पण बदलते म्हणून एकाच मार्गावर विसंबून राहू नका. चांगल आरोग्य, सबल मन तयार करण म्हणजे करिअर घडवण्यासाठी उत्तम काम करणे होय असे मार्गदर्शन डॉ दत्ता कोहिनकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
नवदुर्गा चैतन्य प्रतिष्ठान कोथरूड आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन आणि गुणगौरव समारंभ राजलक्ष्मी सभागृह कोथरूड येथे पार पडला. याप्रसंगी बोलताना माईंड पॉवर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी करिअरच्या विविध वाटा , करिअर निवडण्याच्या पद्धती, यावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कोहिनकर म्हणाले, करिअर उत्कृष्ट घडवण्यासाठी चांगली माणसे जोडा, चांगली संगत धरा , निर्भय व्हा, नैतिक मुल्यांना जपा, माणुसकीचा विकास करा व मनाला सबल करण्यासाठी ध्यानधारणा करा असा सल्ला देऊन मनाच्या ताकदीची काही प्रात्यक्षिके दाखवली.

कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका जयश्री मारणे यांनी केले होते. याप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले म्हणजे त्यांच्या गुणांना वाव मिळतो व त्यांच्यातील आत्मविश्वास वाढतो.
यावेळी पुणे महानगरपालिका माजी सभागृह नेते शंकर केमसे, संजय शिळिमकर, विवेक देशमुख, प्रकाश बर्वे, राकेश शेंडगे, प्रथमेश मारणे, अमृत मारणे, गजानन कड, गीता जोरी, प्रदिप गावडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव ओहाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन केदार मारणे यांनी केले.


