कोथरुड

कोथरुडमध्ये “सफर विमानांची सफर हवाई दुनीयेची” प्रदर्शनाला विद्यार्थी व पालकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

कोथरुड : pune city, Kothrud युध्दात एकतर हार किंवा जित असते तिथे हारल्यानंतर सिल्वर मेडल नसते, त्यामुळे भविष्यात आपण सर्वानी सर्वोत्तम भारत घडविण्यासाठी आपले योगदान द्यावे, सरक्षंण दलातील परिक्षा देताना कोणताही न्यूनगंड विद्यार्थ्यानी बाळगु नये तसेच आता NDA चे दरवाजे मुलींसाठी खुले झाले आहेत, त्यामुळे मुलींनी NDA मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन रि. एअर मार्शल भूषण गोखले यांनी केले.

भारतरत्न माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधत भारतीय जनता युवा मोर्चा कोथरूडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “सफर विमानांची सफर हवाई दुनीयेची” प्रदर्शनाचे उद्घाटन रि. एअर मार्शल भूषण गोखले, भाजप प्रदेशध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शान पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. या प्रदर्शनात विमाने, हेलिकॉप्टर, फायटर जेट, ड्रोन यांच्या विविध प्रतिकृती ठेवण्यात आल्या असून ते पाहण्यात मुले दंग होत आहेत.

या प्रसंगी रि. एअर मार्शल भूषण गोखले यांनी हे डॉ. ए.पी. जे अब्दुल कलाम यांचे सहकारी म्हणून काम करत असताना आलेले अनुभव तसेच त्यांच्या आठवणीनां उजाळा दिला. बांगलादेश फाळणीच्यावेळी केलेल्या कामगिरीचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

Img 20211022 wa0034

आयोजक भाजप कोथरुड युवा मोर्चाचे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ या प्रदर्शनाचा हेतु सांगताना सांगितले की, डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी ज्या पध्दतीने आपल्या स्वप्नांचा पाठलाग करीत भारताला सरक्षंण क्षेत्रात सर्वश्रेष्ठ भारत बनविले, आजच्या पिढीने त्यानां आदर्श ठेवून नवीन शक्तीशाली भारत घडविण्यासाठी सरक्षंण क्षेत्रात आपले करीअर घडवावे यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये