कोथरूडमध्ये वाढती वाहनचोरी..तर गाडी मालक अडचणीत येऊ शकतात..

कारवाई करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची पोलिसांकडे मागणी..
कोथरूड : कोथरूड मध्ये सध्या वाहन चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गुजरात कॉलनी, वानाज कॉर्नर, आझाद नगर सारख्या वर्दळीच्या ठिकाणी ही चोरीचे प्रकार घडत असून सोसायटीमधून पार्क केलेल्या टू व्हिलर गाड्या चोरीला जात आहेत. कोथरूड परिसरात वाढलेली ही वाहनचोरी थांबण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भातकोथरूड विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे अध्यक्ष गिरीश गुरनानी यांच्या कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देशमाने यांना निवेदन देण्यात आले असून दुचाकी चोरांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे

गिरीश गुरनाने यांनी सांगितले की, तू चाकी गाडी चोरल्यानंतर संबंधित चोर पेट्रोल संपेपर्यंत गाडी फिरवतात व पेट्रोल संपल्यानंतर गाडी कोठेही सोडून जातात, त्यामुळे गाडी वेगवेगळ्या ठिकाणी आढळून येते.
गाडी चोरी गेलेली तक्रार कराव्यास व्यक्तींची आपण 24 तास वाट पाहू व त्यानंतर गुन्हा नोंदवू असे पोलिसांकडून सांगण्यात येते. व 24 तासानंतर देखिल पोलीस गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करतात. चोरलेल्या गाडीचा वापर करून दुसरा चोरट्यांनी दुसरा कुठला गुन्हा केला तर गाडी मालकाला त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. त्यामुळे हे प्रकार थांबवण्यासाठी वाहन चोरट्यांना पकडून त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या वेळी पोलीस निरीक्षक देशमाने यांनी आठवड्याभरात या चोराचा तपास करून कडक कारवाई करण्यात येईल असे अश्वासन दिल्याचे गुरुनानी यांनी सांगितले. या वेळी संघटनेचे पदाधिकारी ऋषिकेश शिंदे, अमित भगत, अमित नवले, रोहन मिसाळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.









