महाराष्ट्र

५ जुलै पासून होणारे विधिमंडळ अधिवेशन होऊ देणार नाही ; मराठा आरक्षणावरून विनायक मेटे यांचा सरकारला इशारा..

पुणे : मराठा आरक्षणा संदर्भात इन्टरव्हेशन दाखल करण्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत तसेच थोरात समितीने अहवाल दाखल करून दोन आठवडे लोटले आहेत, तरीही सरकारकडून कोणतीच हालचाल नाही, त्यामुळे हे सरकार केवळ मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. Vinayak Mete aggressive from Maratha reservation;  Warning to the government

मेटे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आज शिवसंग्राम संघटनेची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मेटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील भूमिका जाहीर केली. यावेळी शिवसंग्रामचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे, प्रदेश सचिव शेखर पवार, शहराध्यक्ष भरत लगड, नितीन ननावरे, महिला अध्यक्षा कालिंदि गोडांबे, सामाजिक न्याय विभागाचे कल्याणराव अडागळे, शहराध्यक्ष विनोद शिंदे, चेतन भालेकर, अजिंक्य राजपुरे, समीर निकम, नवनाथ पायगुडे, सचिन दरेकर,आदी उपस्थित होते.

मेटे म्हणाले, न्यायालयाच्या बाहेरचे विषय जसे की सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसतिगृह योजना, फी प्रतिपूर्ती योजना, रखडलेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या इ. निर्णय सरकार एका दिवसात घेऊ शकते. पण मराठा आरक्षणा बाबत तसे होताना दिसत नाही. याचाच अर्थ या सरकारला मराठा समाजाला काहीही द्यायचेच नाही असाच होतो.

IMG 20210522 WA0203

कोर्टाच्या निर्णया नंतर मराठा समाजाला EWS चा लाभ देण्यासही हे सरकार तयार नव्हते. शेवटी शिवसंग्रामच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागली व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना नोटिसा काढल्यानंतर त्यांना जाग आली व EWS आरक्षण देणे भाग पडले. आम्ही दि.५ जूनला बीड येथे काढलेल्या मोर्चामूळे सरकारचे धाबे दणाणले व तातडीने पंतप्रधानांची भेट घ्यायला धावावे लागले. अर्थात तेथे काय चर्चा केली हेही गुलदस्त्यात आहे.

काल सारथी विषयक झालेल्या बैठकी बाबत व खा. युवराज संभाजीराजे यांच्या आंदोलना बाबत विचारले असता मेटे म्हणाले की, सरकारने सध्या ब्रिटिशांच्या प्रमाणे “तोडा आणि झोडा” नीतीचा वापर चालवला आहे. काही लोकांना गोड गोड बोलून, मोठेपण देऊन समाजाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. तसेच चळवळीत फूट पडण्याचा हा डाव आहे. बाकी संभाजी राजे यांच्या आंदोलनाचे आम्ही स्वागतच करतो. मराठा समाज आता सरकारच्या भूलथापांना बळी पडणार नाही. आम्ही आमचे आंदोलन थांबवणार नाही हे नक्की !

आंदोलनाची सुरुवात आम्ही बीड येथे भव्य मोर्चा काढून केलेलीच आहे. आता दि.२६ जून म्हणजेच आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या दिवशी संभाजीनगर (औरंगाबाद) येथे धरणे आंदोलन होणार आहे तसेच दि.२७जून रोजी मुंबई येथे १०,००० (दहा हजार) मोटरसायकल रॅली निघणार आहे. पुढील काळात पुणे विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन तसेच मोर्चा व इतर कार्यक्रमांचे नियोजन आहे.

सरकारने त्यांच्या सर्वस्वी हातात असलेले विषय तातडीने सोडवले नाही तर दि.५ जुलैला सुरू होणारे विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही असा इशारा मेटे यांनी सरकारला दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये