पुणे शहर
मुली देशाचं उज्वल भविष्य घडविणार- सुलभा वानखेडे;आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानचे वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव

पुणे : “मुली देशाचं उज्वल भविष्य घडविणार”आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानचे वतीने दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव व काही विशेष सत्काराचे कार्यक्रमामध्ये राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेच्या प्राचार्या सुलभा वानखेडे या प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बोलत होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोगत संस्थापक-अध्यक्ष गणेश सातपुते यांनी केले.व आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सिताराम तोंडे पाटील यांनी केले. प्रतिष्ठानचे वतीने कोरोना कालावधीचे दोन वर्षे वगळता सातत्याने 15 वर्ष या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात 165 विद्यार्थ्यांचा व 4 विशेष सरकारचे आयोजन करण्यात आले होते.




