पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी;पुण्यातील रुग्णालयाला विदेशातून ई-मेल

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बस्फोटात उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही धमकी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात विदेशातून ई-मेलवरून देण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.या प्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
देशाच्या पंतप्रधानांना जीवे मारण्याचीधमकी देणारा ई-मेल आल्यानंतर पुणे पोलिसांनी अलंकार पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देण्याच्या धमकीसह देशभरात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकीही या ईमेलमध्ये देण्यात आली आहे.

पुण्यातील दीनानाथ हॉस्पिटलमध्ये ‘मोखीम’ या नावाने ई मेल करुन ही धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर विदेशातून मेसेज करत एकाने ही धमकी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय आहे धमकी : दीनानाथ रुग्णालयात आलेल्या धमकीच्या मेलमध्ये ‘ मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असून विशिष्ट धर्माच्या लोकांना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे.’ अशा आशयाचा मजकूर या धमकीच्या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. देशात अनेक ठिकाणी घातपात घडवून आणण्याची धमकीसुद्धा आरोपी ‘मोखीम’ या नावाने जीमेल वापरणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. या सगळ्या प्रकारानंतर धमकीचा मेसेज आलेल्या व्यक्तीने पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस पुढील तपास करत आहेत.



दीनानाथ रुग्णालयात आलेल्या धमकीच्या मेलमध्ये ‘ मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असून विशिष्ट धर्माच्या लोकांना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे.’ अशा आशयाचा मजकूर या धमकीच्या मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. देशात अनेक ठिकाणी घातपात घडवून आणण्याची धमकीसुद्धा आरोपी ‘मोखीम’ या नावाने जीमेल वापरणाऱ्या व्यक्तीने दिली आहे. या सगळ्या प्रकारानंतर धमकीचा मेसेज आलेल्या व्यक्तीने पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अलंकार पोलीस पुढील तपास करत आहेत.









