महाराष्ट्र

महाराष्ट्राबाबत दुजाभाव का? छगन भुजबळांचा सवाल

शिर्डी : जी.एस.टी (GST) संदर्भात महाराष्ट्राचा (Maharashtra) वाटा २३ हजार कोटी आणि गुजरातचा (Gujarat) फक्त ९ हजार कोटी आहे. तरीही महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव का (Why Maharashtra hurted) केला जातो, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्राचे महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्राला कमजोर (Trying to weak maharashtra) करण्याचे हे प्रयत्न आहेत मात्र महाराष्ट्र कमजोर होणार नाही, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Fb img 1647413711531 1

एसटीच्या विलनीकरणाचे काय झाले?

“राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा” हे दोन दिवसीय कार्यकर्ता शिबीर शिर्डी येथे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थित पार पडले. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. ते म्हणाले, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावरून आमच्यावर टीका केली गेली. महाविकास आघाडी सरकार असताना विलनीकरणाची मागणी केली गेली, आंदोलन केले गेले, एव्हढच नाही तर पवार साहेबांच्या घरावर हल्ला झाला. आता त्या मागणीचे झाले काय ? आता का एसटीचे विलनीकरण केले जात नाही…? असा सवाल उपस्थित करत केवळ पवार साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी यावेळी सांगितले.

फुले, शाहु, आंबेडकरांच्या राज्यात द्वेषाचे राजकारण

फुले, शाहु, आंबेडकरांच्या राज्यात धार्मिक द्वेषाचे राजकारण काही मंडळी करु पाहत आहेत. पण ते विसरतात की धर्मांध सत्तेच्या विरोधात उभे राहण्याची ताकद फुले – शाहु – आंबेडकरच आम्हाला देतात. धर्मांध पक्षाशी लढा हा विकासाच्या मुद्दावरुनच करावा लागेल. आपण विकासाचे राजकारण करतो पण देशात सध्या काय चालु आहे याचा विचार करत आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला तयार रहावं लागणार आहे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Img 20221012 192956 045 1

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न आ वासून उभे

शेतकऱ्यांवर पावसामुळे मोठे संकट ओढावले मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची मदत हे सरकार देत नाही. महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांचे प्रश्न आ वासून उभे असतांना नोटेवर कोणाचा फोटो याचीच चर्चा जास्त असल्याची टीका त्यांनी केली. भुजबळ म्हणाले की, देशात वाढती महागाई, बेरोजगारी, गॅसचे दर, पेट्रोलचे दर, अर्थव्यवस्थेची लागलेली वाट, कोळसा संकट, वाढते खाद्यतेल दर या सगळ्या वरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी जाणुन बुजुन तुमच्या समोर वेगळे मुद्दे आणले जात आहे. जेंव्हा केंद्रात आघाडी सरकार होते तेंव्हा महगाईचा दर हा ४.७ % टक्के होता. आज हा दर १४.५५ % टक्के एव्हढा वाढलाय की तुमच्या घरात तुम्हाला रोज लागणाऱ्या सगळ्या वस्तुंच्या किमती ह्या २०० ते ३०० टक्क्यांनी वाढल्या आहेत.

सत्य परिस्थितीवर बोलले तर

सत्य परिस्थितीवर बोलले तर भाजपच्या यंत्रणा कामाला लागतात आणि मग घरी केंद्र सरकारच्या यंत्रणा येऊन पोहचतात. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आलेल्या कार्यकर्त्याच्या मागे कायम ठामपणे उभा राहतो. ईडीने कारवाई केल्यानंतर जामिन लवकर मिळत नाही. मालमत्तेवरील जप्ती लवकर मुक्त होत नाही आणि वर्षानुवर्षे केस बंद होत नाही. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या कारवाया या फक्त भाजप सोडून इतर पक्षातील नेत्यांवरच होत आहेत, याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये