पुणे शहर

महापालिकेची निवडणूक महायुती म्हणून लढविणार- डॉ. नीलम गोऱ्हे; कोथरूडमधील “या”जागेवर महायुतीत शिवसेनेचा पहिला दावा

पुणे : आगामी काळात महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्या निवडणुका महायुतीच्या वतीने एकत्र लढविल्या जाणार असल्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींच्या असल्याचे शिवसेना नेत्या, उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 12 मधील चार पैकी एक जागा शिवसेना पक्षाने जिंकली होती. त्यावेळी पृथ्वीराज सुतार शिवसेना पक्षाकडून विजयी झाले होते. मात्र सुतार आत्ता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आहेत. मात्र हि जागा शिवसेनेची असल्याने या जागेवर शिवसेनेचा उमेदवार म्हणून उपशहरप्रमुख नितीन पवार यांनी पहिला दावा केला आहे.

आगामी पुणे महापालिका निवडणूकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलेली असताना या निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महायुतीमध्ये लढणार की स्वतंत्र हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडी मध्ये लढणार की स्वतंत्र याबाबतही कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढविणार असल्याचे सांगीतले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी कोथरूड मध्ये लढणार असल्याचे सांगितल्याने याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला सुरवात झाली आहे.

Img 20250508 wa0001235733770892078245

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना सदस्य नोंदणी आणि आरोग्य शिबिराचा कार्यक्रम उद्घाटन शिवसेना नेत्या आणि उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. युवासेना सचिव किरण साळी, सुदर्शना त्रिगुनाईत, श्रद्धा शिंदे, अनिकेत जावळकर आदी उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उपशहरप्रमुख नितीन पवार यांनी आयोजन केले होते.

Img 20250811 wa0010773531396557201299

कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा महायुतीचा बालकिल्ला आहे. कोथरूड आणि शिवाजीनगर हे दोन मतदारसंघ तसेच पुण्यातील अनेक भाग. शिवसेनेचे बालकिल्ले असल्याचे सांगत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. आरोग्य शिबिराचा लाभ प्रत्येकाने घ्यावा, या निमित्ताने मी सर्वाना एक सांगू इच्छिते की, आपल्या सर्वांच्या पाठीशी महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. तसेच सर्वांचे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी राहू द्या.

Img 20240404 wa0013282293280934616164697357

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये