महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनाना प्रतिक्षा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची; कोण होणार यंदाचा मानाच्या महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मानकरी

पुणे : महाराष्ट्रामधे दर वर्षी महाराष्ट्राच्या सर्व जिल्हातून अनेक पैलवान वजनगटा नुसार जिल्हाच्या निवड चाचणीमधे विजय मिळवुन महाराष्ट्र केसरी मधे सहभागी होत असतात वर्षभर तालमीमधे मेहनतीच परिश्रम करुण ह्या स्पर्धेची तयारी करुण विजयी होण्याचा निर्धार करुन महाराष्ट्रामधील सर्व जिल्हा कुस्तीगीर संघ पैलवान वस्ताद व कुस्ती शौक़ीन हे आतुरतेने वाट पहात असतात.
महाराष्ट्र केसरी 1961-2024 कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सॅस्थेअंतर्गत गेली सहा-सात दशकापासून राज्यातील सर्वोच्च अश्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
महाराष्ट्र केसरी ही माती व गादी (मॅट) विभाग मधे होते.यामध्ये माती विभागातील विजेता मल्ल यांच्यात महाराष्ट्र केसरी गदेसाठी अंतिम लढत आंतरराष्ट्रीय नियमानुसार मॅट वर होते आणि या अंतिम लढ़तीतील विजेता मल्लाला महाराष्ट्र केसरी हि मानाची गदा बहाल केली जाते. विधानसभेच्या निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन लवकर व्ह्याव हीच वाट समंध महाराष्ट्रातील कुस्तीशौक़ीन हे पाहत आहेत. अशी प्रतिक्रीया कुस्ती मल्लविद्या पुणे शहर अध्यक्ष पै निकुंज दत्तात्रय उभे यांनी व्यक्त केली आहे.

उभे म्हणाले, कुस्ती टिकावी इथल्या मातीतून चांगले मल्ल तयार होऊन ते देश विदेशात देखील चमकावे हाच उद्देश्य या स्पर्धेचा असावा महाराष्ट्र हिंदकेसरी होऊन न थांबता नॅशनल गेम्स /ओलम्पिक यांसारख्या स्पर्धेपर्यंत पोहचण्याची पैलवानानीच नाही तर कुस्तीगीर परिषदेने क्रीड़ामंत्राणी सुद्धा अतोनात प्रयत्न करायला हवेत.वाढत्या डोपिंगच्या विळख्यामुळे अनेक मल्ल आपला जिव गमावतात काही पैलवानाच डोपिंग बाबत अनुकरण दूसरे पैलवान करुन कुस्तीक्षेत्र बदनाम करतात आणि लाल मातीला काळा डाग लावण्याच पाप करतात. त्यासाठी कुस्तीगीर संघाकडे सर्व कुस्तीगिराची महाराष्ट्र केसरी / राष्ट्रिय आंतरराट्रीय निवडचाचणी मधे डोपिंग चाचणी घ्यावी आणि त्याचा खर्च आयोजकाकडे नसून तो क्रीड़ामंत्री महाराष्ट्र सरकारने करावा.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा चालू असताना सामन्या दरम्यान एखादया पंचाकडून किंचितशी चूक होते.त्याचा फटका त्या पैलवानाच्या वर्षभराच्या मेहनतीला बसतो.त्यानंतर आयोजकड़ुंन केलेल्या सुंदर नियोजनाला बाकी पंच कमिटी व कुस्तीगीर परिषदेला नाहक बदनामीचा त्रास भोगावा लागतो. ह्यासाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धेअगोदर अचूक नियमावली साठी पंच प्रशिक्षण शिबिर हे नावाला न होता कटाक्षाने निरीक्षणाखाली व्हावे ही भावना आहे.



त्याचबरोबर जे महाराष्ट्र केसरी होतात त्याना तर नोकरीची संधी सरकार करत आहे ही अभिमानची गोष्ट आहे पण बाकि गटात महाराष्ट्र चॅम्पियन होणाऱ्या मल्लाना देखील सरकारने नोकरीची संधी द्यायला हवी. असेही उभे म्हणाले.
दोन वर्षापासून कुस्तीगीर परिषदेंमधे चालू असलेल्या दोन गटाचा दोन महाराष्ट्र केसरीचा पैलवानाना होणारा कोणी कुठ खेळायच कोणी कुठ नाही खेळायच अश्या पद्धतीच्या पत्र प्रसारित नंतर होणारा जाच ह्या वर्षीतरी होणार नाही. आणि परिषदेंकडून आपल्या खुर्चीवर बसून राजकारणाी मंडळींना आपल्या स्वार्थासाठी चुकीची माहिती देत त्याना पुढ करुण राजकारणी डाव हे काही कुस्तीगीर संघातील पदाधिकारी हे आपल्या खुर्चीच्या शर्यतीत असलेल्या व्यक्तिना टाकत असतात मात्र ह्याचा मार हा सर्व पैलवानाना व कुस्तीशौक़ीनानवर बसतो आणि ते कुस्तीशौक़ीन हे ह्या नादापासून अलिप्त होण्याचा विचार करतात हे कुठतरी थांबल पाहिजे नाहीतर एक दिवस संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवान मंडळी रस्त्यावर उतरताना दिसतील. असा इशारा उभे यांनी दिला आहे.