कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या ई-कचरा संकलन मोहिमेत १ टन ७८० किलो ई कचरा जमा

कोथरूड : कोथरूड मधील तीन केंद्रांवर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागाच्या वतीने ई कचरा e-waste संकलन मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत १ टन ७८० किलो वजनाचा ई कचरा जमा करण्यात आला. प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण हजेरी कोठी अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला.
१) डहाणूकर कॉलनी वामनराव महाडिक उद्यान गोल सर्कल गणपती मंदिर २) वुडलैंड को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी ३) तेजस मैदान या तीन संकलन केंद्रावर ई वेस्ट कचरा संकलन राबवण्यात आला.
शुन्य कचरा प्रकल्प उपक्रमाद्वारे तीनही संकलन केंद्रावर ६ नग मोठे टि.व्ही., ७ नग संगणक व कीबोर्ड, ३ नग लॅपटॉप, १० नग सौर उर्जा दिवे, ५ नग टेपरेकॉर्डर, ४ कि. मोबाईल चार्जर, ३ नग जुने रेडिओ, १३ किलो जुने चपला व बुटे, ५६ कि. जुने कपडे, ११ नग तुटलेले मोबाईल, २७ नग जुने कॅसेट असे एकूण १,७८० किलो म्हणजे एक टन सातशे ऐंशी किलो वजनाचे ई कचरा जमा करण्यात आला.
या उपक्रमात एकूण ८८ नागरिकांनी आपल्या घरातील वापरात न येणारे ई कचरा व प्लास्टिक वेस्ट देऊन सहभाग नोंदवला. या उपक्रमाची माहिती एक आठवडा आधी सर्व सोसायट्यांच्या व त्या प्रभागातील समस्या ग्रुप वर दिली जाते. शिवाय पत्रके प्रत्येक सोसायटीमध्ये वाटून माहिती देऊन जनजागृती करण्यात येते. त्यामुळे नागरिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो.

“स्वच्छ भारत अभियान स्वच्छ सर्वेक्षण मिशन २०२३” अन्वये “शुन्य कचरा प्रणाली प्रकल्प व ३ आर कचरा संकलन” उपक्रम प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण हजेरी कोठी अंतर्गत गेली १२ वर्षापासून सातत्याने चालू आहे. सदर उपक्रम पुणे महानगरपालिका, कमिन्स इंडिया लिमिटेड,जनवानी सहकारी संस्था या स्वयंसेवी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी सकाळी ९ ते १.३० वाजताच्या दरम्यान राबवण्यात येतो.
या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांच्या घरातील ई कचरा, प्लास्टिक वेस्ट, गाद्या, उषा, जुने कपडे, उपयोगात न येणारे लाकडी व लोखंडी फर्निचर, काच, चप्पल, बुट व इतर आडगळीचे साहित्य जमा करण्यात येते. नागरिकांनी आपल्या घरातील उपयोगात न येणारे साहित्य दर महिन्याच्या ड्राइव्ह मध्ये जमा करावे असे आवाहन कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्यात येते.
अशाच प्रकारे संपूर्ण पुणे शहरात प्रत्येक आरोग्य कोठीच्या अंतर्गत ई वेस्ट, आडगळीचे साहित्य असा उपक्रमाद्वारे जमा केले तर पुणे शहरातील शून्य कचरा होण्यास मदत होईल. सदर उपक्रम महापालिका सहाय्यक आयुक्त केदार वझे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक करण कुंभार, सचिन लोहकरे, रूपाली शेंडगे यांच्या निरीक्षणाखाली मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, आरोग्य कर्मचारी परेश कुचेकर, कुणाल जाधव, प्रविण कांबळे, जनवाणीचे समिर आजगेकर, जयश्री पाटील, जगन्नाथ ढगे यांनी परिश्रम घेतले.



