कोथरूडमध्ये महाआरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या ११३ रुग्णांची होणार शस्त्रक्रिया

माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिर
रक्तदान शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
कोथरूड : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व स्व. जनाबाई बलभीम मोकाटे यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रबोधन विचारधारा कोथरुड संस्थेच्या वतीने रक्तदान महायज्ञ व महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर हजारो नागरिकांनी विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून घेतल्या.
कोथरूड मधील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक चौक येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार चंद्रकात मोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सलग १० वर्षे हा उपक्रम यशस्वीरीत्या सुरु असुन या वर्षीदेखील या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
या उपक्रमा अंतर्गत रक्तदान, मोफत नेत्रचिकीत्सा व चष्मेवाटप,अस्थिरोग तपासणी, ह्रदयरोग तपासणी, हिमोग्लोबीन तपासणी, मुत्ररोग तपासणी, मणक्यांचे आजार, स्त्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व जनरल चेकअप अशा विविध प्रकारच्या आरोग्य तपासणी मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपक्रमात सहभागी होत आरोग्यसेवेचा लाभ घेतला.
यावेळी ५३९ रक्तदात्यांनी रक्तदान केले तर हजारो नागरिकांनी आरोग्यसेवांचा लाभ घेतला. या शिबीरामध्ये ह्रदयरोग,अस्थिरोग व नेत्ररोग असे आजार आढळलेल्या ११३ रुग्णांच्या शस्त्रक्रीया अल्पखर्चात करण्यात येणार आहेत. देवयानी मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांच्या सौजन्याने यावेळी नागरिकांना आरोग्यसेवा पुरवण्यात आली. आधार ब्लड बँक,लायन्स क्लब ऑफ २१ सेंच्युरी यांचेदेखील सहकार्य यावेळी लाभले.










या शिबीराचे उद्घाटन विधापरिषद उपसभापती नीलम गोरे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी उल्हास पवार,मोहन जोशी, सहसंपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, प्रशांत बधे, दिलीप वेडेपाटील, बाळासाहेब दाभेकर, गजानन थरकुडे, डॉ.श्रीरंग लिमये , महेंद्र काळे, शिरीष राणे, मंदार जोशी, माजी नगरसेवक विशाल धनवडे, शाम देशपांडे, अल्पना वरपे, हर्षाली माथवड, वासंती जाधव, श्रद्धा प्रभुणे, वृषाली चौधरी, बाबा धुमाळ, राजाभाऊ बराटे, अजय भोसले, उज्वल केसकर, राजु गोरडे तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी झाल्याबद्दल नागरिकांचे व सर्व सहकाऱ्यांचे आभार संयोजक ॲड योगेश मोकाटे यांनी व्यक्त केले.


