सिलंबम जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दीवा प्रतिष्ठान संचलित सद्गुरू प्रशिक्षण केंद्राच्या 41 विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल; राष्ट्रवादी शहराध्यक्ष दीपक मानकर, हर्षवर्धन मानकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक

पुणे : पुणे जिल्हा सिलंबम असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाठी, काठी, तलवार, भाला जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दीवा प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कला,क्रीडा,लाठी-काठी प्रशिक्षण केंद्राच्या 41 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल पटकावले.या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड मतदारसंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन मानकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी दिलीप कानडे, बाबू शेख, जावेद शेख,भूषण शिर्के, लाठी काठी प्रशिक्षण केंद्राचे आदित्य केंजळे, योगेश वराडे आणि पालक वर्ग उपस्थित होता.

पुणे जिल्हा सिलंबम असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाठी काठी, तलवार, भाला जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये दीवा प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कला क्रीडा लाठी काठी प्रशिक्षण केंद्राच्या 41 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल पटकावले. तर 31 विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल पटकावले. तसेच 29 विद्यार्थ्यांनी ब्राँझ मेडल पटकावले.
यावेळी बोलताना दीपक मानकर म्हणाले, लाठी, काठी, तलवार, भाला ही शस्त्र कला शिवरायांच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने वापरली गेली. याच शस्त्रांचा वापर करून इतिहास घडला आहे. नव्या पिढीमध्ये हि कला अशा स्पर्धांच्या माध्यमातून जोपासली जात आहे.



हर्षवर्धन मानकर म्हणाले, नव्या पिढीला लाठी, काठी, तलवार, भाला या शस्त्र कलेची माहिती व्हावी.आणि हि नवी पिढी या कलेमध्ये पारंगत होण्यासाठी दीवा प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कला क्रीडा लाठी काठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेल्या विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश पाहून अभिमान वाटतो.















