नगरसेवक किरण दगडे पाटील आयोजित काशी यात्रेत ३००० नागरिकांनी पहिल्या श्रावणी सोमवारच्या दिवशीच घेतले काशी विश्वनाथाचे दर्शन
नगरसेवक किरण दगडे पाटील आयोजित नागरिकांची मोफत काशी यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न
पुणे : माजी नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या वतीने मोफत आयोजित करण्यात आलेल्या काशी विश्वनाथ दर्शन यात्रेत काशीला गेलेले भोर- मुळशी- वेल्हा तालुक्यातील 3 हजार नागरिकांची कशी यात्रा भक्तिमय वातावरणात पार पडली. आपल्या हिंदू परंपरेमध्ये हिंदू तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यायची प्रत्येकाला आस असते,भूक असते. हे दर्शन घेतल्यानंतर माणूस धन्य होतो, एक आत्मिक समाधान या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला मिळत असते. गेलेले नागरिक हे आत्मिक समाधान घेऊन समाधानी झाल्याचे चित्र या यात्रेच्या निमित्ताने पहिला मिळाले.
भोर विधानसभा मतदारसंघाच्या भोर- मुळशी- वेल्हा तालुक्यातील तसेच बावधन, भुसारी, शास्त्रीनगर या प्रभागातील नागरिकांसाठी आयोजित केलेल्या या मोफत महातीर्थ काशी विश्वनाथ दर्शन यात्रेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 3000 नागरिकांना काशीयात्रा घडली, काशी यात्रेच्या या संपूर्ण प्रवासात यात्रेचे आयोजक किरण दगडे पाटील यांचे संपूर्ण कुटुंब नागरिकांच्या समवेत होते. या दरम्यान प्रत्येक भाविकाची आपुलकीने काळजी घेतली गेली.
या संपूर्ण यात्रेत नागरिकांना संपूर्ण ४ दिवस सकाळी नाष्टा, दुपारी जेवण, सायंकाळी चहा नाष्टा, संध्याकाळी जेवण तसेच वाराणसी येथे पोहचल्यानंतर बनारस स्टेशनपासून निवासस्थानापर्यंत वाहतूक व्यवस्था, निवासाची सोय, जेवण, दर्शन, आरती अशा सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यात्रेस आलेल्या जेष्ठ नागरिकांची विशेष खबरदारी घेण्यात येत होती. डॉक्टरांची एक टीम ही भाविकांची काळजी ट्रेन मध्ये होती. संपूर्ण सुविधांनीयुक्त अशा या यात्रेत श्रावणच्या पहिल्या सोमवारी दर्शन घेऊन भाविकांची काशी विश्वनाथ यात्रा संपन्न झाली.
किरण दगडे पाटील यांची ही दुसरी मोफत काशी यात्रा होती. या पुढेही दरवर्षी मोफत काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचे आयोजन केले जाणार असून यावर्षी देखील २५ हजार नागरिकांना काशी दर्शनासाठी नेण्याचे उद्दिष्ट किरण दगडे पाटील यांच्याकडून ठेवण्यात आले आहे.
नागरिकांशी झालेल्या जिव्हाळ्याच्या नात्यामुळे समस्त नागरिक यात्रेसाठी येण्यासाठी इच्छुक असतात. हाच विश्वास आणि जिव्हाळा यापुढेही असाच राहील असा विश्वास व्यक्त करतानाच यात्रा सुरक्षित व केलेल्या नियोजनानुसार भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली असून यात्रेतील भाविकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला समाधान मिळाल्याचे माजी नगरसेवक किरण दगडे पाटील व माजी सरपंच पियुषा दगडे पाटील यांनी सिंहासन न्यूजशी बोलताना सांगितले.