पुणे शहर

पिंपरी- चिंचवडमध्ये एच ३ एन २ बाधित व्यक्तीचा मृत्यू

पुणे : पिंपरी- चिंचवड शहरात एच ३ एन २ ने बाधित असलेल्या एका ७३ वर्षीय वृद्धाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. ८ मार्च पासून त्या वृद्धावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन महापालिकेचे डॉक्टर विनय पाटील यांनी केले आहे.

गेल्या ८ मार्च पासून त्यांच्यावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी मास्क वापरावा. ताप, सर्दी, खोकला असेल तर योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन एच ३ एन २ तपासणी करून घ्यावी. वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेचे डॉक्टर विनायक पाटील यांनी केले आहे.

Img 20220425 wa0010281293566257648464944671

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये