पुणे शहर

पार्टनरशीपच्या नावाने दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी

पुणे : कंपनीच्या डिलरशीपमध्ये पार्टनरशीप देतो, असे म्हणून दोन कोटींची फसवणूक करणाऱ्या संतोष चिंचवडे (रा.बाणेर) आरोपीस दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध आणखी आकाश जाधव, संदीप ताम्हाणे, सचिन बालवाडकर, संतोष सातव या नागरिकांनी तक्रार दिली आहे.

याआधी संतोष चिंचवडे, रोषणा संतोष चिंचवडे, अर्चना जगताप यांच्या विरोधात रमेश गायकवाड, जयंत लिमये, सदाशिव कुलकर्णी, प्रतीक राणवाडे, बबन रासकर, युवराज धनकुडे यांनी त्यांची दोन कोटींची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल आहे. फिर्याद दाखल झाल्यावर हे तीन आरोपी फरार झाले होते. या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आरोपींपैकी अर्चना जगताप यांना जामीन मंजूर झाला. रोषणा चिंचवडे आणि संतोष चिंचवडे यांना जामीन मंजूर झाला नाही. त्यानंतर आरोपी संतोष चिंचवडे हा फरार झाला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीचा माग काढत आरोपीला अटक केली. आरोपी संतोष चिंचवडे याला न्यायालयाने आज दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपी रोषणा चिंचवडे अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Img 20220425 wa0010281293566257648464944671

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये