राष्ट्रीय
पेट्रोल-डिझेलची दरवाढ सुरूच; जाणून घ्या आजचा दर

मुंबई : पेट्रोल- डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. देशात 22 मार्चपासून इंधन दरवाढ सुरुच आहे. त्यामुळं मुंबईत पेट्रोल 115 रूपये 88 पैसे प्रति लीटर झाले आहे. डिझेल 100 रूपये 10 पैसे प्रति लीटर झाले आहे.
इंधनवाढीच्या माध्यमातून केंद्र सरकारने एप्रिल ते डिसेंबर 2021 या कालावधीत पेट्रोल, डिझेल आणि अन्य पेट्रोलियम उत्पादनांच्या विक्रीतून 3.31 लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.




