सुजात आंबेडकरांनी राज ठाकरेंना दिला हा सल्ला

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर कुर्ला येथे शाब्दिक हल्ला चढवत त्यांना तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लीम दंगलींवर उभा करू नका, असं म्हटलं आहे. कार्यकर्त्यांआधी त्यांनी अमित ठाकरे यांना हनुमान चालिसा म्हणायला लावावा, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला आहे.
सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, “सध्या रमजानचे दिवस चालू आहेत. राज ठाकरे यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही शरद पवार यांची मुलाखत घ्या, तुम्ही स्वतःचा उभा पक्ष भाड्याने लावून दुसऱ्याच्या प्रचाराला फिरा, पण तुमचा संपलेला पक्ष हिंदू मुस्लीम दंगलींवर उभा करू नका.”
“महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना माझं आवाहन आहे की तुमच्या सर्वांसमोर राज ठाकरे यांनी वक्तव्य केलंय. जर दंगल झाली तर तुम्हाला माहिती आहे कोणाला पकडायचं आहे,” असंही सुजात आंबेडकर यांनी नमूद केलं.




