पुणे शहर
उदय सामंत हल्ला प्रकरण : शिवसेना शहरप्रमुखांसहीत पाच जणांना अटक

पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्यावर कात्रज चौकात झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांची कात्रज चौकातील सभा झाल्यानंतर तेथून काही कार्यकर्ते जात होते. त्यावेळी शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांची कार कार्यकर्त्यांना दिसली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत, गाडीची काच फोडली. सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामध्ये गाडीतील एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर उदय सामंत यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पुणे पोलिसांनी रात्रभर छापेमारी करीत शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह पाचजणांना अटक केली आहे.




