महाराष्ट्र

शिवसेना- एकनाथ शिंदे वादावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 10 दिवस लांबणीवर

शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या वादातील १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यालयातील सुनावणीकडे लागले होते. मात्र, आता ही सुनावणी पुन्हा एकदा तब्बल १० दिवस पुढे ढकलली आहे. विशेष म्हणजे आजच शिवसेनेनं मुखपत्रातून शिंदे सरकावर टिका करताना मंत्रिमंडळ विस्तार ही लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे.

शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष सर्वोच्च न्यायालयात गेल्यामुळे आता, न्यायालयाचा निर्णय काय येतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र, या सत्ता संघर्षाचा पेच सुटत नसल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिकांवर सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार होती. ती आता १२ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली असून ती आता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे, सध्याच्या मंत्र्यांना आणि भाजपला काहीसा दिलासा मिळाला आहे, असेच म्हणता येईल.

Fb img 1647413711531

सरन्यायाधीश रमण्णा हे २६ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्याजागी उदय लळित हे सरन्यायधीशपदाची जबाबदारी स्विकारत आहेत. त्यामुळे, आता शिंदे विरुद्ध शिवसेना यांच्यातील न्यायालयीन लढाई रमण्णा यांच्या कोर्टात संपुष्टात येते की लळित यांच्यापर्यंत पोहोचते हे पाहावे लागेल.

Img 20220801 wa0304

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये