तब्बल 29 तासानंतर पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूकीची सांगता…

पुणे : यंदा पुण्यात गणपती मिरवणूक चर्चेचा विषय ठरली. दोन वर्षांनी मोठ्या उत्साहाने पुणेकरांनी गणेशोत्सव साजरा केला. अनंत चतुर्दशीला सुरु झालेली विसर्जन मिरवणूक थेट 29 तासांनंतर संपली. आज सायंकाळी साडे पाच वाजता शेवटच्या महाराष्ट्र तरुण मंडळाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.
28 तास झाल्यानंतरही मिरवणुका संपल्या नव्हत्या. शहरात नागरीकांच्या मोठ्या रांगा होत्या. त्यामुळे यंदा पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणुक यंदा विक्रम करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत होता. काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 10 वाजता मिरवणुकीचा नारळ फोडण्यात आला होता. त्यानंतर 29 तासानंतर म्हणजेच 5:30 वाजता पुण्यातील शेवटच्या गणपतीचं विसर्जन झालं.
अनंत चतुर्दशीला सुरु झालेली विसर्जन मिरवणूक थेट 29 तासांनंतर संपली. 28 तास झाल्यानंतरही मिरवणुका संपल्या नव्हत्या. शहरात नागरीकांच्या मोठ्या रांगा होत्या. त्यामुळे यंदा पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणुक यंदा विक्रम करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत होता.




