महाराष्ट्र
शिंदेंच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ठाकरेंची तोफ

ठाणे : दसरा मेळाव्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या टेंभी नाका इथं उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. या सभेच्या माध्यमातून ते थेटपणे एकनाथ शिंदे यांना आव्हान देणार आहेत. ही सभा उद्धव ठाकरेंसाठी गेम चेंजर ठरु शकते असंही मानलं जात आहे. कारण यानंतर काही दिवसांतच मुंबई महापालिकेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
ठाण्यात शिवसेनेचं बस्तानं हलू न देणं तसेच एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला उद्धस्त करणं हे ठाकरे यांचे लक्ष्य असल्याचे मानले जात आहे. ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर शिंदे गट काय भूमिका घेतोय हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.










