माझे कुटुंब – माझी जबाबदारी या अभियानाला कोथरूडमध्ये सुरवात

कोथरुड : कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या
” माझे कुटुंब – माझी जबाबदारी ” या अभियानाची सुरवात कोथरूड – बावधान क्षेत्रीय कार्यालयामध्ये शिवसेना गटनेते, नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी सहआयुक्त संदीप कदम, क्षेत्रीय कार्यालय मुख्य अभियंता प्रसन्न कुलकर्णी, विभागीय आरोग्य निरिक्षक राम सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश साबळे, प्रमोद चव्हाण, सचिन लोहकरे, नवनाथ मोकाशी, गणेश साठे, वैजनाथ गायकवाड, हनुमंत पिंगळे, लक्ष्मण काळे, जयंत वानखेडे, प्रशांत खाडे आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज सुतार म्हणाले की, दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत चालला असून आता प्रशासनाबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी वाढली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ” माझे कुटुंब – माझी जबाबदारी ” ही मोहीम जाहीर केली आहे. त्यानुसार सर्वांनीच योग्य खबरदारी घेतली तर कोरोनाचा संसर्ग नक्की आटोक्यात आणला जाऊ शकतो.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गणेश चौंधे,गणेश घोलप यांनी सहकार्य केले.



