राष्ट्रीय

Monsoon 2023 : अखेर मान्सूनचं केरळमध्ये आगमन, महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार दाखल 

मुंबई : केरळ किनारपट्टीवर अखेर मान्सूनचं आगमन झालं आहे. हवामान विभागानं याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचं आगमन केरळमध्ये होतं, यंदा तब्बल ७ दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे.

नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, ८ जून २०२३ रोजी प्रवेश केला आहे. मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरु आहे. केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, मन्नारचे आखातात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन १६ जूनला होईल असा अंदाज आहे.

Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

सकाळपासून केरळमध्ये सर्वच भागात पाऊस सुरु आहे. केरळमध्ये दरवर्षी १ जूनला मान्सून दाखल होतो. मात्र, यंदा त्यासाठी सात दिवसांचा उशीर झाला आहे. यावर्षी मान्सून ८ जूनला दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजुनसार तळ कोकणात १६ जूनला मान्सून दाखल होईल. महाराष्ट्रातही बळीराजा आणि उकाड्याने हैराण झालेले सर्वसामान्य नागरिक मान्सूनची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Fb img 16837376233493064729888638918603

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये