पुणे शहर

पुणे लोकसभा पोटनिवडणूक ओबीसी आघाडी लढवणार

पुणे : लोकसभा पोटनिवडणूक झाल्यास ती लढविण्याचा निर्धार ‘ओबीसी राजकीय आघाडी’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे यांनी व्यक्त केला आहे. पुण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. २२ ओबीसी संघटनांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केल्याचा दावा त्यांनी केला.

Img 20230610 wa00057237527746484988937

ओबीसी जनगणना व जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा 

ओबीसी जनगणना व जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा राजकीय अजेंड्यावर आल्याशिवाय तो सुटणार नाही. त्यासाठी ‘ओबीसीं’नी आपली स्वतंत्र राजकीय आघाडी स्थापन करून निवडणुकीत आपले स्वतंत्र उमेदवार उभे केले पाहिजेत, असा निर्णय ओबीसी बैठकीत झाल्याचे त्यांनी सांगितले. आजवर सर्वच राजकीय पक्षांनी खोटी आश्वासने देऊन ओबीसींच्या तोंडाला पाने पुसल्याचे त्यांनी म्हटलंय.

Img 20230610 wa00452049733278487094475

“मराठा समाजाला दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नाकारले असून यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने २९ मे रोजी काढलेला अध्यादेश म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे,” असे सांगून प्रा. देवरे यांनी अध्यादेशाची प्रत फाडून निषेध नोंदविला.

Fb img 16837376233493064729888638918603
Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये