पुणे आणि सातारासह 4 जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी

पुणे : हवामान विभागाने आज बुधवारी 26 जुलै रोजी राज्यातील इतक्या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांना सतर्क आणि गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
राज्यावर कमी दाबचा पट्टा हा कायम असल्याने पावसाचा जोर हा अद्याप कमी झालेला नाही. यामुळे अनेक जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, पश्चिम महाराष्ट्राला रेड तर मराठवाडा विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.घाट परीसरात मुसळधार पावसाची शक्यता तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्याच्या विविध भागात सध्या जोरदार पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापुरात अनेक गावे पाण्याखाली आले आहे. नद्यांनी देखील पुरस्थिती ओलांडली असून नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासाने दिल्या आहेत. मुंबईत तर पावसामुळे बिकट अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी पावसाचे पाणी सचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई उपनगरासह ठाणे, पालघर भागात पावसाने कहर केला आहे. तर कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे.
आज कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, पालघर आणि मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. तर गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्य्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.



कोकण आणि गोव्यात पुढील पाच दिवस बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात घाट विभागात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर २६ जुलैला घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. २७ ते २८ जुलैला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पुढील पाचही दिवस मेघगर्जनेसह वीजांचहा कडकडाट होऊन पाऊस होण्याची शक्यता आहे, तर विदर्भात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी मुसरधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २६ आणि २७ जुलै ला मेघगर्जनेसह जोरदार पावसाची तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता हवमान विभागाने वर्तवली आहे.



रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. प्रशासन सध्या अलर्ट मोडवर आहे. खेड तालुक्यातील पावसानं चांगलाच जोर धरलेला आहे. खेडच्या जगबुडी नदीला पूर आला आहे. पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. धरण परिसरात सुरु असलेल्या पावसानं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सुरू करण्यात आला आहे



