पुणे शहर

चांदणी चौकातील कामातील गंभीर त्रुटी तातडीने दूर करा अन्यथा आंदोलनाचा मनसेचा इशारा

पुणे : पुणे शहरातील पश्चिमेचा दरवाजा असणारा महत्वाचा (एन.डी.ए )चांदणी चौकाचे आपल्या हस्ते उद्घाटन झाले. या पुलासाठी तब्बल ८६५ कोटी रुपये खर्च केला. मात्र या सर्व पुलाचे नियोजन करताना अनेक गंभीर त्रुटी मनसेने निर्दशनास आणुन दिल्या आहेत.

याबाबतीत मनविसेचे प्रमुख संघटक प्रशांत कनोजिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पत्रव्यवहार करून चांदणी चौकातील त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे. तसेच तातडीने या त्रुटी दूर न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही कनोजिया यांनी दिला आहे.

काय काय महत्त्वाच्या त्रुटी आहेत त्या पुढील प्रमाणे.

१) सार्वजनिक महिला पुरुष स्वच्छता गृहांची कमतरता.
२) एन डी ए वरून अप अँड अबोव्ह हॉटेल जवळुन पौड़ कडे जातानाचे ९० अंशाचे वळण आत्ताच सुधारुन घेणे. अन्यथा भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.
३) पौड-मुळशी, मुंबई-बेंगलोर कडे जाणा-या बसेस, एस.टी., प्रवासी कंपनीच्या बस, रिक्षा-टॅक्सी स्टँडची कमतरता.
४) पौड-मुळशी कडुन बावधन भुसारी कॉलोनीत उतरणा-या प्रवाशांची सोय व योग्य असा थांब्याचा
गरजेचा आहे.  
५) सर्वच ठिकाणी नागरिकांना पादचा-यांसाठी पदपथाची व्यवस्थाच नाही.

Img 20230803 wa00041486684870724290474

६) उत्तरेकडुन दक्षिणेकडे किंवा दक्षिणेकडुन उत्तरेकडे रस्ता ओलांडण्यासाठी भुमीगत टनेलच हवाय. पादचा-यांसाठी लोखंडी फ्लायओव्हर करुन चांदणी चौकाचे नैसर्गिक सौंदर्य घालवु नये.
७ ) नागरिकांसाठी दिशादर्शक फलक अजुनही नाहीत.
८) चांदणी चौकाचे विद्रुपीकरण करणा-या सर्व होर्डिंग्जची परवानगी रद्द करावी.
९ ) एकही बेकायदेशीर खाद्यपदार्थांची गाडी या परिसरात अतिक्रमण न होण्यासाठी नियोजन हवे.
१०) पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी काहीच नियोजन केलेले नाही. हजारो नागरिक जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडत आहे. अनेक नागरिकांचे अपघात घडत आहेत.
११) सर्वच ठिकाणी उतार संपल्यावर ड्रायव्हरला सावध करणारे रब्लिंगचे गतिरोधकच नाहीत.
१२) अपघातग्रस्तांसाठी मदत केंद्र टोईंग व्हॅन ॲंम्ब्युलन्स उभ्या करण्यासाठी अधिकृत जागाच नाही. ती तातडीने करण्यात यावी.
१३) भुगाव वरुन बावधन मध्ये वळताना ब्लाइंड स्पॉट झाला आहे. अपघात होण्याची दाट शक्यता आहे. १४) चांदणी चौक उभारताना डी. पी व प्रायमुव्हच्या नकाशे नियोजनात न घेतल्याने भविष्यात रस्त्यावर पुर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
१५) अनेक नागरिक कामाला जाताना कामगार वर्ग त्यांचे दू चाकी चार चाकी वाहन पार्किंग करून कंपनीच्या बस किंवा कॅबने कामाला जातात. सर्व नागरिकांना पार्किंगची व्यवस्था करणे गरजेचे होते. 
१६) राष्ट्रीय महामार्ग वेद भवन जवळ असणारे अग्नि शामक केंद्र त्वरित कार्यान्वित करणे गरजेचे आहे.

कनोजिया म्हणाले, सर्व मुद्द्यांवर आपण लवकरच निर्णय घ्यावा आणि कार्यवाहीचे निर्देश द्यावेत अन्यथा मनसेच्या वतीने या ठिकाणी नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहिल. यावेळी सुभाष आमले, नितीन गायकवाड , किरण जाधव, प्रसाद गोखले उपस्थित होते.

Img 20230511 wa000228129
Img 20230717 wa0012
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये