पुणे शहर

कोथरूडमध्ये लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांकडून अभिवादन !

पौड रस्त्यावर अण्णा भाऊ साठे चौकात जयंती उत्साहात..

कोथरूड : कोथरूड मधील पौड रस्त्यावर असणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौकात वंचित घटकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

सकल मातंग समाज कोथरूड, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष विजय डाकले यांच्या मार्गदर्शनाखाली चौकात जयंतीचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. 

याठिकाणी उच्च तंत्र शिक्षण मंत्री व कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, शिवसेना गटनेते, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक अविनाश बागवे, माजी आमदार शरद ढमाले, संदीप बुटाला, लहुजी शक्ती सेनेचे प्रमुख विष्णू कसबे, अनिल हतागळे, नवनाथ जाधव, रामभाऊ कसबे,  बाळासाहेब खंकाळ, शिवाजी चव्हाण, पप्पू टेमघरे आदींसह कोथरुडसह पुणे शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन केले.

Img 20240802 wa00043899375665261452206
Fb img 16474137314571819310932637888379

जयंतीनिमित्त मातंग समाज अण्णा भाऊ साठे चौकात एकवटला गेला होता. सर्वांनी एकमेकांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अण्णा भाऊंनी समाजासाठी, कष्टकरी वर्गासाठी आपल्या शहीरीतून उठवलेला आवाज, लिहलेले मराठी साहित्य यावर चर्चा झाली.

संयोजन समिती मधील कैलास कदम, संतोष शेडगे, अशोक जाधव, नवनाथ कांबळे, पप्पू चांदणे, सचिन डाकले, अशोक लोणारे, नामदेव ओहाळ, संतोष कांबळे, अमोल जगताप, वसंत ओहाळ व इतर सदस्यांनी जयंती नियोजनबध्द पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न केले.

Img 20240404 wa00123413096165072096535
Img 20240404 wa00134916733315783821383

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये