पुणे शहर

कर्वेनगरमध्ये भीषण अपघात ;  भरधाव कार धडकली झाडावर…

कर्वेनगर : कर्वेनगरमध्ये भीषण अपघात घडला असून चालकाचा ताबा सुटल्याने कार जोरात जाऊन झाडावर धडकली आहे. कर्वेनगर मधील मावळे आळी येथे हा अपघात घडला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात काल मंगळवारी रात्री उशिरा घडला असून दोन जण जखमी झाले आहेत. कर्वेनगर मधील मावळे आळी परिसर प्रचंड वर्दळीचा असून रात्री  उशिरा हा अपघात घडल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे सांगितले जात आहे. 

रात्रीच्या वेळी वेगात जाणाऱ्या एम एच १२ व्ही एल ४९०० या क्रमांकाची ह्युंदाई क्रेटा चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याकडेला असणाऱ्या झाडावर जाऊन जोरात आदळली. धडक एवढी जोरात होती की कारच्या इअर बॅग बाहेर येऊन फुटल्या गेल्या.

वारजे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांनी सांगितले की, रात्री उशिरा ११ च्या सुमारास हा अपघात घडला आहे. चालकाचा ताबा सुटल्याने कार कार झाडावर धडकली गेली असल्याची माहिती आहे. जखमी दोघे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. एमएलसी आली नसून ती आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.

Fb img 16474137314571819310932637888379
Img 20240404 wa00134916733315783821383
Img 20240404 wa00123413096165072096535

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये