कोथरूड मधील लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुउद्देशीय हॉल व श्रीमती सुमनताई माथवड भाजी मार्केट तातडीने खुले करावे अन्यथा तीव्र आंदोलन करणार गिरीश गुरनानी

पुणे : लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुउद्देशीय हॉल व श्रीमती सुमनताई रामचंद्र माथवड भाजी मार्केट इमारतीला कामी आणावे व लोकांच्या सेवे साठी भाजी मार्केट तातडीने खुले करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी दिला आहे. याबाबतीत गुरनानी यांनी कोथरूड क्षेत्रीय कार्यालय आयुक्तांना निवेदन दिले आहे.
गिरीश गुरनानी म्हणाले, पुण्यातील कोथरूड येथे असलेल्या सुतार दवाखाण्याजवळ मोठी वर्दळ असते. अनेक भाजी व फळ विक्रेते येथे रस्त्यावर आपला माल विकत असतात. अश्यातच येथे होणारी गर्दी लक्षात घेता शासनाने एक अधिकृत इमारत बांधून त्यात मंडई चालू करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी घेतला. त्याचं अनुषंगाने टॅक्स भरणाऱ्यांचे अनेक पैसे खर्च करून ही इमारत बांधण्यात ही आली. तिचे नामकरण लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुउद्देशीय हॉल व श्रीमती सुमनताई रामचंद्र माथवड भाजी मार्केट असे करण्यात आले. परंतु अनेक दिवस उलटून गेल्यानंतरही ही इमारत तिचे उद्देश साधण्याच्या प्रतीक्षेत आहे.
मोकळी इमारत ही वाया गेलेला लोकांचा निधी व वेळ दर्शवते. तरी प्रशासनास विनंती की लौकरात लवकर ठोस पाऊले उचलून या इमारतीला कामी आणावे व लोकांच्या सेवे साठी भाजी मार्केट खुले करावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गिरीश गुरनानी यांनी दिला आहे.













