पुणे शहर
शिवसेना कोथरूड युवा सेना अध्यक्षपदी देवेंद्र सुतार यांची निवड

पुणे : शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून कोथरूड विधानसभा युवा सेना अध्यक्ष पदी देवेंद्र चंद्रकांत सुतार यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्य युवा सेना सचिव किरण साळी यांच्या कडून निवड करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महानगर पालिका निवडणुकी च्या तयारी साठी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून मोर्चे बांधणी करण्यास सुरवात कऱण्यात आली आहे. नुकतीच कोथरूड विभाग प्रमूख पदी उदय भेलके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता शिवसेना कोथरूड युवा सेना अध्यक्षपदी देवेंद्र सुतार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.













