कोथरुड

कोथरूड मध्ये २ हजार ६२७ किलो ई कचरा संकलीत       

कोथरूड :- स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२०- २१” च्या अन्वये प्रभाग क्रमांक १२, डहाणूकर कॉलनी व मयूर काॅलनी अंतर्गत आरोग्य विभागाच्या वतीने एकूण ११ संकलन केंद्र उभा करून ई कचरा व प्लॅस्टिक संकलन महाअभियान राबविण्यात आले. या मोहिमेत २ हजार ६२७ किलो ई कचरा संकलीत करण्यात आला.

हे अभियान महापालिका  सहाय्यक आयुक्त संदीप कदम  यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली  राबवण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आपल्याकडील ई कचरा व प्लॅस्टिक तसेच अडगळीचे साहित्य दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार डहाणूकर कॉलनी सर्कल, गांधी भवन, तेजस नगर, मयूर काॅलनी, आयडियल काॅलनी, न्यू अजंठा अव्हेन्यू,स्टेट बँक नगर, शर्मद रेसिडेन्सी, स्प्रिंग फिल्ड, आशिष गार्डन इत्यादी परिसरात संकलन केंद्र उभा करण्यात आले होते.

Img 20201028 wa0145

सदर अभियान किर्लोस्कर  कमिन्स इंडिया लिमिटेड,  जनवानी व आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात आले. तसेच या उपक्रमात नागरिकांनी आपल्या कडील ई कचरा व प्लॅस्टिक तसेच अडगळीचे साहित्य संकलन केंद्रावर अतिशय उत्स्फूर्तपणे आणून देऊन या अभियानाला  प्रतिसाद दिला.

Img 20201024 wa0166 1

या अभियानाद्वारे ५ मोठे व ४ एल.ए.डी. टिव्ही, ८ लॅपटॉप, दोन , तीन प्रिंटर, ५०० किलो प्लॅस्टिक, २०० किलो वायर, जुने रेडिओ, ३०० किलो जुने कपडे,१८० किलो वजनाचे सांऊड व अन्य ३०० किलो बॅटरी, चार्जर असे एकूण २,६२७ किलो वजनाचे ई कचरा व प्लॅस्टिक संकलन करण्यात आले.  या उपक्रमाद्वारे जमा झालेले उपयोगी साहित्य गरजू लोकांना मोफत दिले जाते तसेच निरुपयोगी साहित्य रिसाईकलसाठी पाठवले जाते अशी माहिती वैजीनाथ गायकवाड यांनी नागरिकांना दिली.

सदर अभियाना यशस्वी करण्यासाठी आरोग्य निरिक्षक सचिन लोहकरे, प्रमोद चव्हाण, रूपाली शेंडगे, तसेच  मोकादम वैजीनाथ गायकवाड, आण्णा ढावरे, लक्ष्मण सोनवणे, संजय कांबळे तसेच जनवानीचे समीर आजगेकर, जयश्री पाटील, निता नाईक, जगन्नाथ ढगे, दत्ता भिसे, सुरेखा हिंगडे, गौरीशंकर बनसोडे, अमोल जगताप, उमा बोराडे, मधुकर भगत, नितीन कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये