शैक्षणिक

UPSC साऊ फाउंडेशन आणि जनसेवा फाउंडेशनतर्फे मोफत निवासी प्रशिक्षण

UPSC परीक्षेच्या दिशेने एक क्रांतिकारी पाऊल; जिद्द, गुणवत्ता आणि मार्गदर्शनाचा संगम

पुणे : प्रतिनिधी

स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या गुणवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी साऊ फाउंडेशन पुणे आणि जनसेवा फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘UPSC सुपर 40 प्रशिक्षण’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या 40 विद्यार्थ्यांना नागरी सेवा (UPSC) परीक्षेच्या तयारीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Fb img 17803875442192531368419001118856

या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना राहण्याची व भोजनाची मोफत सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, तज्ज्ञ मार्गदर्शन तसेच UPSC पूर्व व मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी आवश्यक प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. मुख्य परीक्षेतील मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांवर आधारित लेखन सराव, नियमित अभ्यासाचे नियोजन आणि प्रगतीचे मूल्यमापन यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

प्रशिक्षणासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा दिलेली असणे आवश्यक आहे. पात्रतेसाठी GS-I मध्ये किमान 60 गुण, CSAT मध्ये किमान 50 गुण तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

उमेदवारांची निवड UPSC पूर्व परीक्षेतील गुणांच्या आधारे करण्यात येणार असून त्यानंतर मुलाखतीद्वारे अंतिम निवड केली जाईल. आर्थिक अडचणींमुळे गुणवंत विद्यार्थ्यांचे UPSC चे स्वप्न अपूर्ण राहू नये, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे संस्थेने स्पष्ट केले.

Img 20251125 wa01783213374507166536090

या उपक्रमास सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, पुणे विशाल मंगल अशोक लोंढे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 20 जून 2026 आहे.

अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रियेसंदर्भातील मार्गदर्शनासाठी श्री. अमृत साळुंखे ( 7900112373) श्री.गुणवंत सावळजकर ( 9890414342) आणि श्री संदीप कांबळे (8378989942) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये